Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee December Paid In January Shasan Adesh ] : सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर 2023 या महिन्याकरीता ( डिसेंबर पेड इन जानेवारी 2024) मासिक सहाय्यक अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय मार्फत दिनांक 09 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील नगरपरिषदांचा जकात कर व महागाई भत्ता रद्द केल्यामुळे त्याऐवजी सदर नगरपरिषदांना सहाय्यक अनुदान वितरीत करण्यात येते . सदर प्रयोजनार्थ सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अर्थसंकल्पित केलेल्या 2695,44,00,000/- आणि पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये एक रक्कमी तडजोड योजना अंतर्गत नगरपरिषदा / नगरपंचायती यांच्याकडील सार्वजनिक पाणीपुवरठा व पथदिव्यांच्या वीजदेयकांच्या मुद्दलाची रक्कम महाविरण कंपनीस प्रदान करणे कर्मचाऱ्यांच्या वेतन आदीकरीता 2,881,69,00,000/- इतक्या अर्थसंकल्पिय तरतुद मंजूर करण्यात आलेली आहे .

माहे डिसेंबर 2023 या महिन्याकरीता डिसेंबर पेड इन जानेवारी 2024 मासिक देय अनुदान रक्कम रुपये 173,88,88,672/- मधून सदर आदेशांमध्ये नमुद 11 स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून सन 2023-24 ते सन 2022-23 या कालावधीमधील प्रतिमाह वसुल करावयाची रक्कम 1,03,23,000/- वजा जाता रक्कम 172,82,65,672 /- रुपये इते अनुदान 282 स्थानिक स्वराज्य संस्था यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .

सदरच्या अनुदानातून राज्यातील नगरपरिषद/ नगरपंचायती यांमधील कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी 2024 करिताचे वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .या संदर्भातील सविस्तर आदेश डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावेत..

अनुदान आदेश

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *