Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Government CM -SHINDE Cabinet Nirnay ] : दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकींमध्ये शिंदे सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठे दिलासादाय निर्णय घेण्यात आलेले आहेत , यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेस मोठे आर्थिक / सामाजिक लाभ प्राप्त होणार आहेत .
श्रीराम प्राणप्रतिष्ठा , छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप : श्रीराम प्राणप्रतिष्ठा दिनांक 22 जानेवारी रोजी अध्योधामध्ये होणार आहे , तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिनांक 19 फेब्रुवारी रोजी असल्याने दिनांक 22 जानेवारी 2024 पासुन आनंदाचा शिधा देण्यात मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे . आनंदाचा शिधा मध्ये साखर , खाद्यतेल , चनादाळ , रवा , मैदा , आणि पोसे असे सहा खाद्य वस्तु असणार आहेत . याचा लाभ राज्यातील तब्बल 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना होणार आहे .
तर राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभाग मधील सर्व जिल्हे ,नागपुर विभाग मधील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हांतील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर , 1 लिटर खाद्यतेल ,चणादाळ , रवा , मैदा , व पोहा प्रत्येकी अर्धा किला या प्रमाणे सहा वस्तुचा संच म्हणून आनंदाचा शिधा वाटप करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . सदर शिधा प्रति संच 100/- याप्रमाणे वितरीत करण्यात येणार आहेत .
प्रधानमंत्री आवास योजना निकष प्रमाणे बांधलेल्या घराऐवजी निर्वाह भत्ता : सदर योजना अंतर्गत बांधालेल्या घराऐवजी 165,000/- रुपये निर्वाह भत्ता अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहेत . यांमध्ये बाधित स्थलांतरील कुटुंबाला दरमहा एक वर्षासाठी तर अनुसूचित जाती आणि अनूसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त अनुक्रमे 3000/- रुपये च 50,000/- रुपये देण्यात येणार आहेत . तर वाहतुक भत्ता म्हणून प्रत्येक बाधिक स्थलांतरील कुटुंबाला वाहतुक खर्च म्हणून 50,000/- रुपये अदा करण्यात येणार आहेत .
पशुधन असणारे / छोटे दुकानदारांना आर्थिक मदत : यांमध्ये गोठा अथवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंब धारकांना एक वेळीची आर्थिक मदत म्हणून 25,000/- रुपये इतकी मदत तर कारागीर / छोटे व्यापारी यांना एक वेळीचे अनुदान म्हणून रुपये 50,000/- रुपये अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .