Spread the love

Live Marathipepar बालाजी पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Employee Adhyayan Raja Niyamavali ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना विविध कारणांसाठी रजा अनुज्ञेय करण्यात येत असतात , यांमध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या विषयातील उच्च शिक्षण / पाठ्यक्रम भारतांमध्ये अथवा परदेशात पुर्ण करण्यासाठी अध्ययन रजा मंजूर करता येते .

अध्ययन रजा घेण्यासाठी कमीत कमी 5 वर्षांची सेवा पुर्ण होणे आवश्यक असते , तसेच रजा संपल्याच्या नंतर कामावर परत येणे आवश्यक असेल तर कामावर परत आल्यानंतरच्या तारखेपासून ते तीन वर्षांच्या आत सेवानिवृत्ती घेता येत नाही . किंवा जे अधिकारी / कर्मचारी अभ्यासक्रम पुर्ण झाल्याच्या तीन वर्षे कालावधीनंतर सेवा निवृत्त होणार असतील अशांना सदरची रजा मंजुर करता येत नाही .

अशा प्रकारची रजा ही वारंवार मंजूर करता येत नाही , त्याचबरोबर ही रजा हक्क म्हणून मागता येणार नाही . जर अभ्यासक्रम भारतांमध्ये उपलब्ध असल्यास , भारताबाहेर जाता येणार नाही . जर अभ्यासक्रम भारतांमध्ये उपलब्ध नसल्यास , सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक असेल .

त्याचबरोबर सदरचे अभ्यासक्रम / पाठ्यक्रम / प्रशिक्षण हे लोकहिताच्या दृष्टीने लाभदायक असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहेत . सदरची रजा ही एकावेळी 12 महिने आणि त्यांच्या संपुर्ण सेवा कालावधीमध्ये एकुण 24 महिने मंजुर करता येईल .

भारता बाहेर अभ्यासक्रम पुर्ण करण्याकरीता मंत्रालयीन प्रशाकीय विभाग सामान्य प्रशासन विभागाशी विचार विनियम करणे आवश्यक असणार आहे .याबाबत पुर्ण अधिकारी सा.प्र.विभागाचा असणार आहेत . तर भारतामध्ये अभ्यासक्रम पुर्ण करण्याकरीता मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचा अधिकार असणार आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *