Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 22 January Public Holiday Declear News ] : दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनांकडून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे , या दिवशी राज्यांमध्ये सर्व शाळा – महाविद्यालये त्याचबरोबर दारुचेही दुकान बंद असणार आहेत .

दिनांक 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे श्री. रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार असल्याने देशभरातील लाखो भाविक उपस्थित होणार आहेत . या सोहळा निमित्त  देशभरातुन येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होणार असल्याने , उत्तर प्रदेश सरकारने , राज्यातील सर्व शाळा – महाविद्यालये तसेच इतर शासकीय कार्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

यावेळी राज्यातील सर्व शासकीय इमारती दिनांक 22 जानेवारीला सजविण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून देण्यात आलेले आहेत . त्याचबरोबर या दिवशी राज्यात कोणत्याही प्रकारची मद्यविक्री केली जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . प्राणप्रतिष्ठेला देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते पुजन होणार असल्याने , सुरक्षितता याकडे अधिक लक्ष देण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर देशभरातुन येणाऱ्या भाविक – भक्तांची राहण्याची व भोजनांची सोय व्हावी याकरीता प्रशासनांकडून सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत . तर अयोध्यामध्ये येणाऱ्या पाहुण्यांकरीता लखनऊमधील हॉटेल्स बुक करण्याकरीता लखनऊ मधील दिनांक 20 ते 23 जानेवारी दरम्यान रिकाम्या असणाऱ्या रुम्सची यादी प्रशासनांकडून मागविण्यात आलेल्या आहेत .  

महाराष्ट्र राज्यात देखिल होणार 22 जानेवारी शासकीय सुट्टी जाहीर : दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी देशभरात मोठा उत्सव साजरा होणार आहे , या दिवशी देशातील हिंदु बांधवासाठी मोठा आनंदाचा दिवस आहे . यामुळे महाराष्ट्र राज्यातुन देखिल अनेक भावी – भत्त अयोध्याला जाणार आहेत . यामुळे दिनांक 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी अनेक आमदारांकडून करण्यात आलेली आहे . यामुळे राज्य शासनांकडून देखिल दिनांक 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *