Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee DA & HRA Increase News ] : सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी खुशखबर मिळणार आहे , ती म्हणजे या नविन वर्षांमध्ये महागाई भत्ता व घरभाडे भत्ता मध्ये मोठी वाढ होणार आहे . या संदर्भातील अधिकृत्त निर्णय सरकारकडून लवकरच घेण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहेत .
महागाई भत्ता मध्ये होणार मोठी वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंतची डी.ए मध्ये मोठी वाढ मिळणार आहे . ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्तामध्ये जानेवारी 2024 पासुन 5 टक्क्यांची वाढ करणे अपेक्षित आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता 51 टक्के होईल , म्हणजेच महागाई भत्ता हा 50 टक्केचा टप्पा पार करेल . महागाई भत्ता मध्ये 50 टक्के पेक्षा अधिक वाढ झाल्यास सातवा वेतन आयोगानुसार घरभाडे भत्तांमध्ये वाढ होणे नियोजित आहेत .
घरभाडे भत्ता मध्ये मिळणार मोठी वाढ ( HRA ) : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा अधिक होईल त्या वेळी घरभाडे भत्ता मध्ये पुढीलप्रमाणे वाढ नियोजित आहे . सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना वास्तव्याच्या ठिकाणानुसार X , Y , Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27 टक्के , 18 टक्के , 9 टक्के घरभाडे भत्ता अदा करण्यात येतो . ज्यावेळी महागाई भत्ता हा 50 टक्के पेक्षा अधिक होईल त्यावेळी X , Y , Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा अनुक्रमे 30 टक्के , 20 टक्के ,10 टक्के घरभाडे होईल .
राज्य शासनांकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकांनुसार सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय करण्यात आलेला महागाई भत्ता हा 25 टक्क्यांची मर्यादा ओलांडेल त्यावेळी X , Y , Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27 टक्के , 18 टक्के , 9 टक्के इतक्या दराने घरभाडे लागू होईल . तर ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारा डी.ए चे दर हे 50 टक्क्यांपेक्षा अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्ताचे दर हे X , Y , Z श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे HRA चे दर अनुक्रमे 30 टक्के , 20 टक्के , 10 टक्के अशा वाढीव दराने मंजुर करण्याचे निर्देश आहेत .
डी.ए वाढीचे निर्णय लवकरच : जानेवारी 2024 करीताचे डी.ए वाढीबाबत निर्णय लवकरच केंद्र सरकारकडून घेण्यात येणार आहे . महागाई भत्ता मध्ये 5 टक्के वाढ करण्यात येणार असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतनांमध्ये मोठी वाढ होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.