Spread the love

Live Mararhipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee good News For Regular Payment CMP SYSTEM ] : राज्यातील शिक्षक बांधवासांठी वेतनाबाबत राज्य शासनांकडून एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे . यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन हे विहीत कालावधी मध्ये विनाविलंब अदा होणार आहेत .

महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक त्याचबरोबर खासगी अनुदानि व अंशत : अनुदानित शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था , खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी 2024 पासुनचे वेतन आता नियमित विहीत वेळेत अदा होणार आहेत . याकरीता भारतीय स्टेट बँकेच्या कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट प्रणालीचा ..

सीएमपी / ई-कुबेर प्रणालीचा होणार वेतन अदा करण्यासाठी वापर : त्याचबरोबर ज्या जिल्हांमध्ये ई- कुबेर ही प्रणाली कार्यरत आहेत अशा जिल्ह्यांत ई – कुबेर प्रणालीचा वार करुन थेट संबंधित शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा करण्यास राज्य शासनांकडून मान्‍यता देण्यात आलेली आहे . राज्यातील विशेषत: खाजगी अनुदानित शाळा महाविद्यालये त्याचबरोबर जिल्हा परिषदा , पालिका प्रशासन यांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन विविध कारणांमुळे विलंब होत असल्याचे राज्य शासनांच्या निदर्शनास आल्याने ..

वेतनाचे सीएमपी प्रणालीद्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचा निर्णय राज्‍य शासनांकडून घेण्यात आलेला आहे . भारतीय स्टेट बँकेची सीएमपी प्रणाली अधिक सोयीस्कर आहे तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये ई-कुबेर प्रणाली अस्तित्वात आहे , त्या जिल्ह्यांत ई- कुबेर प्रणाली द्वारे वेतन आहरण करणेबाबत राज्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी व संबंधित कोषागार अधिाकरी यांचे सुचित करण्यात आलेले आहेत . या संदर्भात राज्‍य शासनांकडून दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी अधिकृत्त शासन निर्णय देखिल निर्गमित करण्यात आलेला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *