Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Inter District Transfer Shasan Paripatrak ] : राज्यातील जिल्हा परिषद मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार , राज्यातील जिल्हा परिषद ( ZP ) शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्य ह्या ऑनलाईन संगणकीय प्रणाली द्वारे करण्याबाबत , सुधारित धोरण ग्रामविकास विभागाच्या दिनांक 23 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार , विहीत करण्यात आलेले आहेत .
त्यानुसार आंतरजिल्हा बदल्याची प्रक्रिया ही vinsys IT Service Private Ltd . या संस्थेकडून पुर्ण करण्यात आलेले आहेत , सदर बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येवून संबंधित जिल्हा परिषदाकडे पाठविण्यात आलेल्या आहेत . बदली प्रक्रिया राबविताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित महत्वाचे असून त्यात खंड पडू नये ..
याकरीता शालेय शिक्ष्ण विभागांकडून पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर स्थानिक परिस्थिती लक्षात घेवून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबतचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी घेण्याचे निर्देश राज्याचे उप सचिव पो.दे.देशमुख यांच्या कडून देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील ग्रामविकास विभागांकडून दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.