Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Shalarth System 7 th Pay Commission 1 ,2,3 Installment shasan Paripatrak ] : शालार्थ प्रणाली मध्ये कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग फरकाचा पहिला , दुसरा , तिसरा हप्ता अदा करण्याचे तसेच वैद्यकीय देयके अदा करणे संदर्भात राज्य शासनांच्या शिक्षण संचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , लेखाशिर्ष 22020182 / 36 , 22020048/36 व 22023708/36 अंतर्गत शालार्थ प्रणाली मध्ये , राज्यातील जिल्हा परिषद ( ZP ) अंतर्गत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला , दुसरा , तिसरा हप्ता अदा करण्याकरीता त्याचबरोबर वैद्यकीय देयके अदा करण्यासाठी माहे डिसेंबर 2023 , जानेवारी 2024 व माहे फेब्रुवारी 2024 या महिन्याकरीता टॅब उपलब्ध करुन देण्याची विनंती करण्यात आलेले आहेत .
सदर शालार्थ प्रणाली मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा पहिला , दुसरा , तिसरा हप्ता अदा करण्याकरीता तसेच वैद्यकीय देयके अदा करण्याकरीता टॅब उपलब्ध करु देणेकरीता श्री.पवन जोशी बिझनेस ॲनालिस्ट , महाआयटी , मुंबई यांना शिक्षण संचालक ( प्राथमिक ) यांच्या मार्फत पत्र सादर करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकांमुळे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक – कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला , दुसरा , तिसरा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . या संदर्भात राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.