Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee [ Thok Allowance Increase for Mantralayin Employee ] : राज्य शासनाकडून राज्यातील खाली नमूद सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे , सदर निर्णयाची अंमलबजावणी या महिण्यांपासूनच करण्यात येणार आहे .
राज्याच्या मंत्रालयीन विभागातील “लिपिक टंकलेखकांना” दरमहा 5,000/- रुपये ठोक भत्ता ( Thok Allowance ) देण्याचा निर्णय दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे , सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मा .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
मंत्रालयीन स्तरावर इतर कामाच्या तुलनेत , मंत्रालयीन कामकाजाचे स्वरूप अधिकच मोठे आहेत . यामुळे मंत्रालयाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेवून सदरचा हा निर्णय घेण्यात आला आहे . सदरच्या निर्णयामुळे तब्बल 11 कोटी 34 लाख 60 हजार रुपये , एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे . सध्या मंत्रालयातल्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये लिपिक-टंकलेखकांची एकूण संख्या 1,891 इतकी असून त्यांना याचा लाभ सदर कर्मचाऱ्यांना होणार आहे .
शिवाय राज्याच्या मंत्रालयामध्ये नव्याने लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्त झालेले लिपिक – टंकलेखक कर्मचारी हे अपुरी आणि महागडी निवास व्यवस्था, जिकिरीचा प्रवास, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात तसेच जवळच्या उपनगरात भाडे तत्वावर घरे उपलब्ध होत नसल्याने सदरच्या या कारणांमुळे अल्पावधीत सेवा सोडून जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने , यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.