Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra Shasan Akaryatmak Peyment Scale Post ] : राज्य शासन सेवेतील अकार्यत्मक पदांना वेतन निश्चिती बाबत या लेखांमध्ये पुरिपुर्ण माहिती देण्यात आलेली आहे . आरेखक , अनुरेखक , तसेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी तसेच शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची अकार्यत्मक वेतनश्रेण्या लागु करण्यात येतात ..

अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना ठराविक काळानंतर वाढीव वेतन श्रेण्या / वेतनस्तर मंजूर करण्यात येत असतील , परंतु त्यांच्या जबाबदाराऱ्यांमध्ये वाढ होत नसतील त्यांना अकार्यात्मक वेतन स्तर म्हटले जाते . ज्या दिवसांमध्ये नविन वेतन स्तर कर्मचाऱ्यांना मंजुर केले जाते , ( यांमध्ये 03 वर्षे / 07 वर्षे / 12 वर्षे / 24 वर्षे ) त्या दिवशी मुळ वेतन स्तरातील वेतना ऐवढी रक्कम जर नविन अकार्यात्मक वेतन स्तरात असल्यास त्याच टप्यावर ( सेलवर ) वेतनिश्चिती होईल , व वेतनवाढीची दिनांक मध्ये बदल होणार नाही .

तसेच ज्यावेळी मूळ वेतन स्तरातील वेतन ऐवढी रक्कम नविन अकार्यात्मक वेतनश्रेणीत नसल्यास , पुढील टप्यावर ( सेलवर ) वेतन निश्चिती करण्यात येते . अशा अकार्यातत्मक वेतननिश्चितीची जर दिनांक ही 01 जुलै ते दिनांक 01 जानेवारी या कालावधीमध्ये येत असल्यास वेतनवाढीची दिनांक ही येणारी 01 जुलै ही असेल .

परंतु जर ही वाढ जर दिनांक 02 जानेवारी ते दिनांक 30 जून या कालावधी दरम्यान झाली असल्यास पुढील वेतनवाढ येणाऱ्या दिनांक 01 जानेवारी रोजी असेल . या संदर्भात वित्त विभागाच्या दिनांक 30 जानेवारी 2019 मधील नियम 10 ,13 व दिनांक 06 नोव्हेंबर 1984 मधील तरतुदींच्या आधारे येणारी वेतन निश्चितीचे उदाहरण पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *