Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Anarjit Leave / Nadey Leave See Detail ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपुर्ण सेवा कालावधीमध्ये , महाराष्ट्र राज्य नागरी रजा नियम नुसार खाली दिलेल्या अटींच्या अधिन राहून अनर्जित रजा / नादेय रजा मंजूर करण्यात येते .

रजेची कमाल मर्यादा : कर्मचारी हा निवृत्ती होत असेल अशा वेळी सेवा निवृत्तीपुर्व रजेमध्ये अनर्जित रजा / नादेय रजा मंजुर करता येत नाहीत .अनर्जित रजा / नादेय रजा ही कर्मचाऱ्यांच्या संपुर्ण सेवा कालावधीत 360 दिवसांच्या कमाल मर्यादेत मंजूर करण्यात येते , वैद्यकीय प्रमाणपत्रा शिवाय अन्य कारणासाठी एकावेळी जास्तीत जास्त 90 दिवसांची आणि वैद्यकीय प्रमाणपत्र असे करुन एका वेळी 180 दिवस इतकी रजा मंजूर करता येते .

अनर्जित रजा / नादेय ही रजा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर अर्जित / अर्धवेतन रजा शिल्लक नसल्यास ही रजा मंजूर करण्यात येत असते . नादेय रजा ही अर्धवेतनी रजेच्या स्वरुपामध्ये मंजूर करण्यात येत असते . अनर्जित रजा उपभोगल्यावर कर्मचारी परत येईल अशा पद्धतीने प्राधिकाऱ्यास खात्री झाल्याशिवाय सदरची रजा मंजूर करता येत नाही .

सदरची रजा मंजूर केल्यानंतर पुढील सेवा कालावधीत जेवढी अर्धवेतनी रजा जमा होते त्या रजेमधून अनर्जित रजा वजा करण्यात येते , म्हणजेच रजा प्रथम रजा दर्शवून ती पुढे समायोजित केली जाते . अशा प्रकारची रजा मंजूर केल्याच्या नंतर रजा समाप्ती नंतर कामावर परत न आल्यास , रजा वेतनाची वसूली करण्यात येते . या संदर्भात संबंधितांकडून रक्कम वसुलीबाबत संमीपत्र घेण्यात येते .

मात्र जर कर्मचारी हा रुग्णावस्थेमुळे आणखी सेवा करण्यास तो असमर्थ झाल्यास , त्यास सेवा निवृत्त केले असल्यास किंवा त्याचे वय 50 वर्षे ( राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी ) व 55 वर्षे ( अरापत्रित अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी ) ऐवढे झाल्यामुळे त्यास सक्तीने सेवानिवृत्त करण्यात येत असल्यास अथवा त्याचा मृत्यु झाला असेल अशा प्रकरणी रजा वेतनाच्या रक्कमेची वसूली करता येणार नाही ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *