Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महागाई भत्ता 42 टक्के पर्यंत वाढ करणे संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 29 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारकडून ( shasan Nirnay ) निर्गमित करण्यात आलेला आहे .

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या क्रमांक 01/01/2023 – E- II (B) , Government Of India Ministery Of Finance , Department Of Expenditure , दिनांक 3 एप्रिल 2023 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे .

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 01जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आलेला 04% टक्के वाढीव दराने महागाई भत्ता ( Dearness Allowance ) व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना सदर शासन निर्णय (Shasan Nirnay ) नुसार लागू करण्यात आलेली आहे .

सविस्तर शासन निर्णय पाहा

सदर शासन निर्णयानुसार दिनांक 01 जानेवारी 2023 पासून 42 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार माहे जानेवारी 2023 ते एप्रिल 2023 या कालावधी मधील महागाई भत्ता (DA ) फरकाची रक्कम माहे मे 2023 महिन्याच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहेत .

या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 29 मे 2023 रोजी डीए वाढ संदर्भात निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे .

शासन निर्णय

आपण जर शासकीय , निमशासकीय , शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हावे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *