राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना द्यावयाचे शिक्षांचे प्रकार , होणारी कार्यवाही जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee punishment and after Process ] : महाराष्ट्र राज्याच्या शासन सेवेतील महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम 1979 अंतर्गत नियम क्र.05 मध्ये शिक्षांचे प्रकार व होणारी कार्यवाही , याबाबत सविस्तर माहिती विशद करण्यात आलेली आहे , सदरचे शिक्षांचे प्रकार पुढीलप्रमाणे  जाणून घेवूयात ..

शिक्षांचे प्रमुख प्रकार : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांने केलेल्या गैरकृत्य बाबत , शिस्त व अपील नियमांनुसार कर्मचाऱ्यांच्या द्यावयाचे शिक्षांचे प्रमुख दोन प्रकार आहेत . यांमध्ये अ ) किरकोळ शिक्षा आ) जबर शिक्षा असे दोन मुख्य शिक्षांचे प्रकार आहेत .  

किरकोळ शिक्षा : किरकोळ शिक्षांचे सहा उपप्रकार आहेत , यांमध्ये अ) ठपका ठेवणे आ) पदोन्नती रोखणे क) नुकसानीची रक्कम वसूल करणे ड) वेतनवाढी रोखणे इ) समय श्रेणीतील खालच्या टप्यावर आणणे ई ) पदावनी देणे असे किरकोळ शिक्षांचे प्रमुख सहा उपप्रकार पडतात .

किरकोळ शिक्षांमध्ये इ व ई उपप्रकाच्या शिक्षा देणेकरीता सदर प्रकणाची चौकशी होणे आवश्यक असते . तर ड उपप्रकारची शिक्षा द्यावयाची असल्यास भविष्यांमध्ये , देण्यात येणाऱ्या वेतनवाढीवर परिणाम होईल कि नाही असे स्पष्ट नमुद आदेशांमध्ये होणे आवश्यक असते .तर वेतनवाढी सलग 3 वर्षाकरीता रोखून ठेवण्यात येणार असतील तर रितसर चौकशी होणे आवश्यक असते , तरच तीन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी वेतनवाढी रोखता येतात ..

जबरी शिक्षा ( कठोर शिक्षा ) : कठोर शिक्षांचे प्रमुख तीन उपप्रकार आहेत , यांमध्ये  ट ) सक्तीची सेवानिवृत्ती ठ ) सेवेतुन काढून टाकणे  फ) सेवेतुन बडतर्फ करणे असे कठोर शिक्षांचे तीन उपप्रकार आहेत . कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कठोर ( जबरी ) शिक्षा करायची असल्यास सदर कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी होणे आवश्यक आहेत , विभागीय चौकशीनंतरच कर्मचाऱ्यांना जबरी शिक्षा करता येते .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment