Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Anukampa New Shasan Nirnay ] : अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा धोरणाबाबत , उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयाच्या धर्तीवर अधिनस्त अकृषी विद्यापीठे , अनुदानित अशासकीय महाविद्यालये , तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालनालय यांच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालये / संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ – लोणेरे , सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ , लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपुर , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ – नाशिक , अनुदानित अभिमत विद्यापीठ यामधील शासनमान्य पदांवरील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्ती योजना लागु करण्याकरीता सर्वसमावेशक आदेश निर्गमित करण्याची तसेच , सदर शैक्षणिक संस्था यामधील गट अ व गट संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .
सदर शासन निर्णयानुसार अकृषी विद्यापीठे , अनुदानित अशासकीय महाविद्यालये , तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालनालय यांच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालये / संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ – लोणेरे , सीओईपी तंत्रज्ञान , विद्यापीठ , लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ – नाशिक , अनुदानित अभिमत विद्यापीठे यामधील नागपूर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ – नाशिक , अनुदानित अभिमत विद्यापीठे यामधील शासनमान्य पदांवरील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू करण्यांसंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांमधील तरतुदी अधिक्रमित करण्यात येत आहेत .
अकृषी विद्यापीठे , अनुदानित अशासकीय महाविद्यालये , तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालनालय यांच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालये /संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ – लोणेरे , सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठ , लक्ष्मीनारायण अभिनव विद्यापीठे यामधील शासनमान्य गट अ ते गट ड पदांवरील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्ती देणे संदर्भात सदर शासन निर्णयातील तुरतुदींच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहेत .
कोविडच्या पार्श्वभूमीवर गट अ व गट ब मधील कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ दिनांक 01 जानेवारी 2020 पासून अनुज्ञेय करण्यात येत आहे अशा दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक वर्ष असणार आहे. या संदर्भात दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत …
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.