Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Bank Account IMP Shasan Nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन बँक खाते संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . याबाबत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात ..
शासकीय / निमशासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा विषयक लाभ आधारीत योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत . वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत , त्याकरीता बँकाकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाहीत . त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकाकडून प्राप्त SGSP अंतर्गत विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी / कर्मचारी यांना वित्त विभागाने शासन परिपत्रक दिनांक 08 ऑक्टोंबर 2020 नुसार अवगत करण्यात आलेले आहेत .
सदरच्या दिनांक 19.12.2023 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार वित्त विभागाच्या दिनांक 08 ऑक्टोंबर 2020 च्या परिपत्रकानुसार राष्ट्रीयकृत बँकाकडून प्राप्त SGSP अंतर्गत अपघात विमा योजनेच्या विविध लाभाबाबत माहिती देण्यात आलेली आहे . सदरची माहिती ही राज्यातील खाजगी अनुदानित , प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहेत .
त्याचबरोबर मा. उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक 09 फेब्रुवारी 2018 रोजीच्या आदेशानुसार , मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत अथवा कोअर बँकींग असणाऱ्या अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य असणार आहेत .
त्याचबरोबर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी यांचे मेन पुल खाते ( पार्किंग खोत ) वित्त विभागाने मान्यता देण्यात आलेल्या राष्ट्रीयकृत्त बँकेत अथवा अन्य बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहेत . या संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.