Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State All School Timeing Change Education Ministry Big Nirnay ] : राज्यातील शाळांच्या वेळांमध्ये बदल करणेबाबत राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या तोंडी सुचनेनुसार , राज्यातील शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी घेतला आहे , या संदर्भातील सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..

आजच्या युगांमध्ये पुस्तकांचे महत्व कमी होवून , संगणक / मोबाईल अशा तांत्रिक साधनांचा वापर अधिक झाले आहेत , जे कि पुस्तकांपेक्षा अधिक ज्ञान देवू शकता आहेत . म्हणजेच पुस्तकांची जागा आता मोबाईल / संगणक अशा तांत्रिक साधनी घेतला आहे . राज्यात अनेक शाळांच्या वेळा ह्या सकाळी असल्याने , त्यावर लहान विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होतो आहे . ज्यामुळे विद्यार्थ्यांची झोप परिपुर्ण होत नसल्याने , गुणवत्ता मध्ये देखिल विपरित परिणाम होत आहेत .

सकाळच्या सत्रात शाळा नाही : सकाळी लवकर शाळा भरविण्यात येवू नयेत , जेणेकरुन विद्यार्थ्यांची झोप परिपुर्ण होईल . अशा प्रकारच्या सुचना राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्य सरकारला केल्या होत्या . यानुसार राज्य शासनांकडून बालरोग तज्ञांच्या अहवालानुसार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी पुढीलप्रमाणे निर्णय दिलेला आहे .  

सकाळी 9 नंतरच भरणार शाळा : राज्यांमध्ये सध्या अनेक शाळांच्या वेळा ह्या सकाळी 7 पासुन आहेत . ज्यामुळे विद्यार्थ्यांची योग्य झोप होत नसल्याने , इयत्ता दुसरीपर्यंतच्या  शाळा ह्या सकाळी 9 वाजेनंतरच भरण्यात येणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे .

शाळांच्या वेळा कधीपासुन बदलणार : राज्यातील सर्व माध्यमातील इयत्ता दुसरीपर्यंतच्या शाळा ( यांमध्ये बालवाडी ते दुसरीपर्यंत सर्व ) ह्या पुढील शैक्षणिक वर्षांपासुन सकाळी 9 नंतर भरवियात येणार आहेत .त्याचबरोबर बालवाडी ते दुसरीला पुर्व प्राथमिक शिक्षण संबोधण्यात येणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे .

या निर्णयानुसार आता सकाळी 7 वाजता भरणाऱ्या शाळा 9 वाजेनंतर भरण्यात येणार आहेत , हा सदरचा निर्णय हा राज्यातील सर्व शाळांसाठी ( खाजगी / अनुदानित / शासकीय) लागू असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *