Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee & Government Contribution Transfer To NPS Account GR ] : सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी , जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100 टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अशंदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अशंदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधीची वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 19.12.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
जिल्हा परिषदा , मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी लागु असलेली परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 19.09.2021 रोजीच्याा शासन निर्णयान्वये विशद केली आहे . तसेच जिल्हा परिषद , मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत जमा झालेली रक्कम NPS योजनाखाली वर्ग करण्यासाठी नविन लेखाशिर्ष उघडण्याकरीता दिनांक 04.03.2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे .
सदर शासन निर्णयानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता एकुण रुपये 3823,73,64/- ( अक्षरी – तीन हजार आठशे तेविस कोटी त्र्याहत्तर लाख चौसष्ट हजार फक्त ) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .लेखाशिर्ष निहाय निधीचे वितरण पुढीलप्रमाणे करण्यात आलेले आहेत .यांमध्ये अर्थसंकल्पित निधी व वितरीत करण्यात आलेली निधीचे सविस्तर विवरण देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये जी- 99 , 8342 इतर ठेवी , 00 – इतर ठेवी , 117 – शासकीय कर्मचाऱ्यांकरीता परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना – 00 – परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना , मान्यताप्राप्त व अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना खाली वर्ग करणे अशा लेखाशिर्षाखाली सन 2023-24 या वर्षाकरीता निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 19.12.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता …
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.