Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pramotin & Ashvasit Pragati Yojana Scheme GR ] : राज्य शासकीय कर्मचारी व जिल्हा परिषद यामधील पदोन्नतीच्या संधी उपलब्ध असलेल्या व एकाकी पदावरील कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक १.४.२०१० आणि ५.७.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील सर्व तरतूदी तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विद्यापीठ उपविभागाच्या संदर्भाधीन अनुक्रमे दिनांक २८.१२.२०१०, दिनांक १५.२.२०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये तसेच तदनंतरच्या दिनांक ३१.५.२०२३ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेल्या लाभांप्रमाणेच आणि त्यामधील नमूद अटी व शर्तींच्या अधीन राहून, राज्यातील तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत असणाऱ्या अशासकीय अनुदानित पदवी व पदविका संस्थेतील तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार “सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” दिनांक १ ऑक्टोंबर, २००६ पासून पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू करताना सदर कर्मचाऱ्यांची सेवाभरती संबंधित संस्थेमार्फत प्रचलित सेवाप्रवेश नियमानुसार आहे किंवा कसे याची खातरजमा करण्याची जबाबदारी संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांची राहील.
वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक १.४.२०१० आणि ५.७.२०१० रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सदरची “सुधारित आश्वासित प्रगती योजना” दिनांक १ ऑक्टोंबर, २००६ पासून पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी येणारा खर्च खालील लेखाशिर्षातून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद विधीमंडळाच्या पुढील अधिवेशनात विहित मार्गाने करण्यात यावी. (एक) ” मागणी क्र.डब्लू -९-२२०३ तंत्रशिक्षण, ११२ अभियांत्रिकी / तंत्र महाविद्यालये संस्था (००) (०१) शासकीय अभियांत्रिकी व वास्तुशास्त्र महाविद्यालये ( वसतिगृहांसहित) (अनिवार्य) ०१, वेतन- २२०३०३२७” (दोन) ” मागणी क्र. डब्लू-३-२२०३ तंत्रशिक्षण, १०२ तंत्रशिक्षणासाठी विद्यापीठांना सहाय्य (०१) (०२) डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड, यासाठी परिरक्षण अनुदाने (कार्यक्रम) – २२०३ ०५२३” या लेखाशिर्ष अंतर्गत निधीची उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ३५१ / २३ / सेवा-३, दिनांक ३० ऑगस्ट, २०२३ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भात दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.