Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee GPF AMOUNT Withdrawn Without Intrest ] : आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर आपणासाठी शासनांची बिनव्याजी हवे तेंव्हा मिळणारी जीपीएफ योजनाबद्दल माहिती असेलच , परंतु या योजनांमधून मिळणरी रक्कम कशा स्वरुपात मिळते , कोणत्या कारणांसाठी मिळते . याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखात पुढीलप्रमाणे घेवूयात ..

राज्यात सन 2005 पुर्वी शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांकरीताच ही योजना लागु आहे , त्यानंतर शासन सेवेत रुजु झालेल्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येत नाहीत . जीपीएफ ही एक सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेव्हिंग साठी उघडण्यात येत असते . या योजनांमध्ये सरकारी आपल्या इच्छेनुसार किमान व कमाल मर्यादेत विशिष्ट रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये रक्कम जमा करत असतो .

ज्या वेळी कर्मचाऱ्यांना आवकश्यता असते त्यावेळी या भविष्य निर्वाह खात्यामधून सदरची रक्कम काढता येते . ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या कडूनच जमा करण्यात येत असते , यामुळे या योजनेतुन काढण्यात येणारी रक्कमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज सरकारला द्यावे लागत नाहीत . सदरच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा रक्कमेवर सरकारकडून व्याज दिले जाते , सदरचे व्याज दर हे दरवर्षी केंद्र सरकार मार्फत बदलण्यात येते . सध्या GPF चे व्याज दर हे 7.1 टक्के आहे .

सदर योजनांमधून किती रक्कम काढता येते : भविष्य निर्वाह खात्यांमध्ये जमा रक्कमेच्या 75 टक्के रक्कम काढता येते , तर काही अत्यावश्यक ( आरोग्य विषयक ) बाबीकरीता 90 टक्के रक्कम काढता येत असते .सदरच्या रकमेची परफेड करण्याची आवश्यक नाही , कारण सदरची रक्कम कर्मचाऱ्यांकडूनच जमा करण्यात येत असते .

NPS धारकांना लागु नाही : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत माहे 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन रद्द करुन राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आल्याने , सदर जुनी पेन्शनमधील भविष्य निर्वाह निधी योजना NPS धारकांना रद्द करण्यात आलेली आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *