Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee DA Vadh New Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची नविन मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे नविन वर्षांमध्ये महागाई भत्यांमध्ये आणखीण 5 टक्क्यांची वाढ लागु करण्यात येणार आहे , या संदर्भात नविन आकडेवारी समोर येत आहे , ती सविस्तर पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
AICPI निर्देशांकाची आकडेवारी : आत्ताची नविन अपडेट नुसार , माहे जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्तांमध्ये वाढ लागु करण्यात येणार असून , यासाठी AICPI निर्देशांच्या माहितीनुसार निर्देशांचा आकडा हा 138.4 पर्यंत पोहोचला आहे , सदर आकडेवारी ही माहे ,ऑक्टोंबर 2023 पर्यंतच जाहीर करण्यात आलेली आहे .म्हणजेच माहे जुलै ते ऑक्टोंबर या कालावधीमध्ये एआयसीपीआय निर्देशांमध्ये 0.9 अंकाची वाढ झालेली आहे .
निर्देशांच्या आधारे डी.ए मधील वाढ : सदर ऑक्टोंबर पर्यंतच्या 138.4 अंकाच्या वाढीनुसार ( 0.9 अंकाच्या वाढ ) महागाई भत्यामधील वाढ ही 49.08 टक्के इतकी होईल . म्हणजेच माहे नोव्हेंबर मधील AICPI च्या निर्देशांकानुसार डी.ए हा 50 टक्के तर होईल तर माहे डिसेंबर महिन्यातील आकडेवारी जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत AICPI निर्देशांकामध्ये 1.50 अंकाची वाढ झाल्यानंतर , महागाई भत्ताचा दर निश्चितच 50.60 टके पर्यंत पाहोचेल .म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांचा माहे जानेवारी 2024 मध्ये एकुण डी.ए हा 51 टक्के होईल .
जुलै 2023 पासून AICIP ची आकडेवारी
महिना/ वर्षे | AICPI | महिना नुसार डी.ए वाढ |
जुलै 2023 | 139.7 | 47.15 |
ऑगस्ट 2023 | 139.2 | 47.15 |
सप्टेंबर 2023 | 137.5 | 48.54 |
ऑक्टोंबर 2023 | 138.4 | 49.08 |
नोव्हेंबर 2023 | – | 49.69 (अंदाजे ) |
डिसेंबर 2023 | – | 50.60 (अंदाजे ) |
अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 मध्ये नविन वर्षांमध्ये महागाई भत्तांमध्ये 5 टक्यांची वाढ मिळणार आहे . यावेळी लोकसभेच्या निवडणुका मार्च / एप्रिल मध्ये जाहीर झाल्याने , डी.ए मधील वाढ ही माहे जानेवारी मध्येच विलंब न करता केंद्र सरकारकडून लागु करण्यात येईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.