Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Transfer New Update From Adhiveshan ] : राज्यातील शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या विशिष्ठ सेवा कालावधीनुसार , एका कार्यालयांतुन दुसऱ्या कार्यालयांमध्ये प्रशासकीय / विनंती / तक्रारी बदली करण्यात येत असते . परंतु यापुढे राज्यातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे नियमित बदल्या होणार नसल्याचे राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठी माहिती दिली आहे .
राज्यांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागेवर लवकरच पदभरती करण्यात येणार असून , शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा अधिक वाढविण्याकरीता यापुढे आता नियमित स्वरुपात शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत , अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे .म्हणजेच आता यापुढे प्रशासकीय स्वरुपातील बदल्या होणार नसुन विनंती बदली , तसेच तक्रारी बदलीच करण्यात येईल .
म्हणजेच शिक्षकांस एकाच शाळेवर नियुक्तीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत एकाच शाळेवर काम करण्याची मुफा असणार आहे . ज्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल असे शिक्षणमंत्र्यांची धारणा आहे . त्याचबरोबर शिक्षकांना निवडणुक आयोग आणि जनगणना या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची शासकीय कामं शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्याा पुर्व परवानगी शिवाय देता येणार नसल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले आहेत .
एक विद्यार्थी असेल तर शाळा बंद नाही : राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे राज्या सरकारचे कोणत्याही प्रकारचे धोरण नाही तर एक विद्यार्थी असेल तरी शाळा सुरु असतील व त्यांना शिक्षक मिळणार आहे . त्याचबरोबर ज्या ठिकाणी शाळेत पोहोचण्याचा प्रश्न आहे , त्याठिकाणी प्रवासाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे केसरकरांनी सांगितले आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.