Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Retirement Date Decide Shasan Nirnay ] : राज्यातील महीला व बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृचा दिनांक निश्चित करणेबाबत महिला व बाल विकास विभाग मार्फत दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील अंगणवाड्यांमधील कार्यरत अंगणवाडी सेविका , मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस या मानधनी कर्मचाऱ्यांचे सेवा समाप्तीचे वय हे महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक 30 नोव्हेंबर 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आली आहे .सदर मानधनी कर्मचाऱ्यांच्या पदभरती प्रक्रिया सुलभ होण्याकरीता राज्य शासनांकडून सदर पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयान्वये सदर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा दिनांक हा प्रत्यक वर्षातील दिनांक 30 एप्रिल हा निश्चित करण्यात आलेला आहे , जेणेकरुन सदर पदांवर पदभरती करणे सोईस्कर ठरणार आहेत .तर सदर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत दिनांक 30 नोव्हेंबर 2018 व दिनांक 02 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही व कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , दिनांक 01 जानेवारी ते दिनांक 01 मे या कालावधी मध्ये जन्म दिनांक असल्यास ( यांमध्ये वरील दोन्ही दिवस धरुन ) त्याच कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 30 एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्त करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तर जन्म दिनांक जर दि.02 मे ते दिनांक 31 डिसेंबर या दरम्यान असल्यास पुढील वर्षाच्या दिनांक 30 एप्रिल या दिनांकास सेवानिवृत्ती देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
या संदर्भात महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेली सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.