Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Arjit Raja Shasan Nirnay ] : दीर्घ सुट्टी कालावधीमध्ये कराव्य लागणाऱ्या कामाबद्दल प्रत्येक कॅलेंडर वर्षात विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करणे व विशेष अर्जित रजेचे रोखीकरण करणेबाबत , ग्राम विकास विभागांकडून दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 च्या नियम क्र.54 नुसार दीर्घ सुटी विभागांमध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांला कोणत्याही वर्षात त्यांनी पुर्ण दीर्घ सुटी घेतली असली तर त्या कर्मचाऱ्यांस त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भात कोणतीही अर्जित रजा मागण्याचा हक्क असणार नाही . महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 नियम क्र.54 ( ए ) मध्ये कोणत्याही एका वर्षाच्या संबंधात शासकीय कर्मचाऱ्यांने दीर्घ सुटीपैकी काही भागाचा लाभ घेतला असेल त्या प्रमाणात 30 दिवसापैकीची अर्जित रजा घेण्याचा हक्क असणार आहे .
सदर तरतुदी विचारात घेवून राज्य शासनांकडून असा निर्णय घेण्यात आला आहे कि , ज्या केंद्र प्रमुखांनी आपल्य वरीष्ठांच्या लेखी आदेशानुसार दीर्घ सुटीच्या कालावधीत काम केले असेल त्याबाबत वरिष्ठांनी प्रमाणित कले असेल तर अशाबाबत त्यांना दीर्घ सुटींच्या कालावधीत केलेल्या कामासंदर्भात प्रत्येकी 10 दिवसांसाठी 30 दिवसाच्या मर्यादेत एक दिवस या प्रमाणात अर्जित रजा देय होईल .
अशा रजेचा संचय करता येईल व ती निवृत्तीच्या वेळेस रोखीकरणास पात्र असणार आहे . तसेच सदरचा शासन निर्णय हा दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन अनुज्ञेय होणार आहे . तसेच हा शासन निर्णय राज्य शासनांच्या वित्त विभागाच्या सहमतीस अनुसरुन निर्गमित करण्यात आलेला आहे .
या संदर्भातील ग्रामविकास विभागांकडून दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.