Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 ची डी.ए वाढ अद्याप प्रलंबित असतानाच , केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2023 मध्ये आणखीण 4 टक्के वाढ करण्यात येणार आहे . नुकतेच गुजरात राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 8 टक्के वाढ करण्यात आलेली आहे , ही वाढ माहे जानेवारी व जुलै 2023 अशा दोन टप्यातील आहे .

जानेवारी 2023 मधील 4 टक्के वाढ : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 मधील 4 टक्के डी.ए वाढ जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत लागु करण्यात येणार आहे . तर लगेच जुलै महिन्यांमध्ये दुसऱ्या टप्यातील डी.ए वाढ मिळणार आहे . गुजरात राज्य सरकारने जुलै 2023 मधील आगाऊ डी.ए वाढीची घोषणा केल्याने , महाराष्ट्र राज्य सरकार देखिल गुजरात राज्य सरकारच्या धर्तीवर डी.ए मध्ये 8 टक्के वाढ करु शकते .

डी.ए थकबाकीची रक्कम : महारष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना 4 टक्के डी.ए वाढ जानेवारी 2023 पासून प्रलंबित असल्याने , हा वाढीव महागाई भत्ता माहे जानेवारी 2023 पासून चार टक्के फरकासह मिळणार आहे . माहे जानेवारी ते मे या पाच महिन्यातील डी.ए फरकाची रक्कम जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत रोखीने मिळणार आहे .

हे पण वाचा : माहे मे 2023 चे वेतन स्थगिती करणेबाबत आदेश निर्गमित !

एकुण महागाई भत्ता 46 टक्के : जानेवारी 2023 मध्ये 4 टक्के वाढ व जुलै 2023 मध्ये 4 टक्के वाढ लागु केल्यास , राज्यातील एकुण महागाई भत्ता दर हा 46 टक्के होणार आहे .महाराष्ट्र राज्य सरकारकडून 4 टक्के डी.ए वाढीबाबतचा प्रस्तावाला सध्या वित्त विभागांकडून अंतिम स्वरुप देण्यात येत आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *