Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : आज दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील तब्बल 17 लाख राज्य शासकीय , निमशासकीय इतर पात्र कर्मचाऱ्यांचा भव्य महामोर्चा नागपुर येथे होणार आहे . या पार्श्वभुमीवर विधानसभेत सदर महामोर्चा बाबत श्री.नाना पटोले ( प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य ) यांनी दि.11.12.2023 रोजी विधानसभेत जुनी पेन्शन बाबत गंभीर नोंद घेण्याची विनंती केली असता , विधानसभेचे अध्यक्षांनी राज्य सरकारला गंभीर नोंद घेवून चर्चा लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
श्री.नाना पटोले यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांची बाजु मांडताना नमुद केले कि , राज्यातील कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा दि.12 डिसेंबर रोजी होणार आहे . कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन ही असून , देशातील अप्रगत राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागु केली आहे , तर महाराष्ट्र राज्यासारखे प्रगत राज्याला जुनी पेन्शन देण्यास काही हरकत नाही .
शिवाय राज्यातील कर्मचारी वेळोवेळी जुनी पेन्शनच्या मागणीकरीता संप / आंदोलने करीत असल्याने , कामकाजावर विपरित परिणाम होत आहे , तसेच कर्मचाऱ्यांची काम करण्याची मनस्थिती कमी होते . कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा तसेच पोटापाण्याचा प्रश्न असल्याने यावर गंभीर नोंद घेवून विधानसभेचे अध्यक्षांनी राज्य सरकारला जुनी पेन्शन लागु करण्याचे आदेश देण्यात यावेत , असे श्री.नाना पटोले अशा प्रकारे कर्मचाऱ्यांची बाजु मांडली .
यावर विधानसभेचे अध्यक्षांनी राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेबाबत गंभीर नोंद घेवून चर्चा लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत , यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि , यावर गंभीर नोंद घेण्यात आली आहे .यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत तोडगा काढण्यात येईल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे .
राज्य सरकारकडून नेहमीच पेन्शन बाबत निर्णय घेण्यास टाळाटाळ करण्यात येते , यामुळे राज्यातील लाखो कर्मचारी आज दिनांक 12.12.2023 रोजी नागपुर येथे अधिवेशनावर भव्य महामोर्चा काढणार आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.