7 व्या वेतन आयोगानुसार या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मुळ वेतनाच्या 12.5% भत्ता मंजुर करणेबाबत GR निर्गमित दि.11.12.2023

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Additional Allowance Shasan Nirnay ] : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत नियुक्ती / प्रतिनियुक्तीने पूर्ण वेळ कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिनांक ०१ जानेवारी, २०१९ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार निश्चित केलेल्या मूळ वेतनाच्या १२.५०% एवढी रक्कम प्रकल्प भत्ता म्हणून अदा करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी प्रदान करण्यात येत आहे. 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातील अधिकारी / कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीनुसार २५ टक्के प्रमाणे प्रकल्प भत्याची अदायगी करण्यात आलेली आहे. मात्र प्रस्तुत शासन निर्णयान्वये दि ०१ जानेवारी, २०१९ पासून ७ व्या वेतन आयोगानूसार निश्चित केलेल्या मूळ वेतनाच्या १२.५०% प्रमाणे प्रकल्प भत्ता मंजूर केलेला असल्याने प्रकल्पामध्ये कार्यरत असलेल्या / बदली / पदोन्नतीमुळे प्रकल्पातून बाहेर पडलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या अतिप्रदानाची वसूली संबंधित कार्यालयाने करावी. त्याचे संनियंत्रण प्रकल्प संचालक कार्यालयाकडून करण्यात येणार आहेत .

तसेच सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना जादा दिल्या गेलेल्या रकमेची वसुली व समायोजन बाबतची तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील नियम १३४ – ए मध्ये आहे, तसेच सदर नियमाच्या नियम १४२ (२) मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्याकडून शासकीय निवासस्थाना व्यतिरिक्त येणे असलेल्या रकमांचे समायोजनाबाबत तरतूद आहे. सदर नियमांतील तरतूदीनूसार अतिप्रदानाच्या वसूलीबाबत कार्यवाही करण्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच अतिप्रदान झालेल्या प्रकल्प भत्त्याच्या भरलेल्या आयकराचा परतावा मिळणे नियमानुसार शक्य नसेल अशा परिस्थितीत भत्त्यावरील फरकावर भरलेला आयकर वजा करुन संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून अतिप्रदानाची वसूली करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच  प्रकल्पांतर्गत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अदा करावयाच्या प्रकल्प भत्त्याची रक्कम प्रकल्प किंमतीतून भागविण्यात यावी व ती जागतिक बँकेकडून प्रतिपूर्तीसाठी अनुज्ञेय असणार आहे .

त्याचबरोबर प्रकल्पातंर्गत मंजूर केलेल्या ८०५ पदांपैकी १३२ पदांना प्रकल्प भत्ता मंजूर केलेला असून सदर पदांची यादी या शासन निर्णयासोबत परिशिष्ट – अ येथे जोडण्यात आलेली आहे . तसेच  सदर प्रकल्प भत्ता पूर्णतः स्वतंत्र असून तो इतर कोणत्याही बाबीच्या परिगणनेसाठी अथवा प्रयोजनासाठी विचारात घेता येणार नाही ( महागाई भत्ता, दैनिक भत्ता, प्रवास भत्ता, वेतनवाढ, वेतन निश्चिती, सेवानिवृत्ती वेतन इ.) 

 संदर्भाधिन शासन निर्णय दिनांक २८ सप्टेंबर, २०१७ मधील तरतूदी नुसार, प्रकल्पांतर्गत शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांचे मंजूर पद श्रेणी अवनत करून ते कनिष्ठ अधिकारी / कर्मचाऱ्यांमधून भरण्यात आले असल्यास सदर कनिष्ठ अधिकारी / कर्मचाऱ्यांना देखील प्रकल्प भत्ता अनुज्ञेय असणार आहे .तसेच  प्रकल्पांतर्गत कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या पदांवर जर शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांची अपवादात्मक परिस्थितीत नियुक्ती करावी लागल्यास सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांना देखील प्रकल्प भत्ता अनुज्ञेय राहील. 

तसेच  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रकल्प भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. या संदर्भात कृषी पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांकडून दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment