Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Medical check shasan Nirnay ] : राज्य शासन सेवेत कार्यरत वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागांकडून दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणारे वय वर्षे 40 ते 50 या वयोगटातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची 02 वर्षांतुन एकदा तर वय वर्षे 51 व त्यापुढील वयोगटातील अधिकारी / कर्मचाऱ्यांची वर्षातुन एक वेळ वैद्यकीय तपासणी करणे अनुज्ञेय असणार आहेत . सदर वैद्यकीय तपासणीकरीता राज्य शासनांकडून कमाल 5,000/- रुपये इतक्या रक्कमेच्या खर्चाची प्रतिपुर्ती करण्यास राज्य शासनांकडून सदर नमुद शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे .

सदर प्रतिपुर्ती रक्कम अधिकारी / कर्मचाऱ्यांनी प्रथम स्वत : अदा करावी व त्याची प्रतिपुर्ती रुपये 5,000/- इतक्या रकमेच्या मर्यादेत वेतनासोबत आपल्या कार्यालयातुन अदा करण्यात येईल , सदर प्रतिपुर्तीचा लाभ घेतल्यानंतर आयकर परिगणना करण्याकरीता याचा लाभ देय होणार नाहीत .40 वर्षे व त्यावरील वयोमर्यादा असलेला सर्व वेतनश्रेणी व गटातील कार्यरत शासकीय सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता वैद्यकीय चाचण्यांचा तपशिल खाली नमुद शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .

सदरच्या चाचण्या कर्मचाऱ्यांने शासकीय / निमशासकीय रुग्णालये / वैद्यकीय महाविद्यालेय येथे केल्यास , नाममात्र अथवा निशुल्क असल्याने त्यांची प्रतिपुर्तीची रक्कम 5,000/- इतक्या रकमेपर्यंत असणार आहेत . त्याचबरोबर प्रतिपुर्तीची मागणी करताना वैद्यकीय चाचण्यां केल्याचे संबंधित संस्थेचे मुळ देयक कार्यालयास सादर करणे बंधनकारक असणार आहेत .

वैद्यकीय चाचणीचा दिवस हा रजेचा दिवस न धरता कर्तव्यकाळ म्हणून समजण्यात येईल . तसेच तपासण्यांसाठीची पुर्वतयारी / आवश्यक खबरदारी सुद्धा रुग्णालयाच्या सल्यानेच अधिकारी / कर्मचारी यांनी स्वत घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

वैद्यकीय चाचण्यांवरील खर्च संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्या आस्थापनेवरील वेतन व भत्ते खर्चांतर्गत लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले असून , त्या- त्या वर्षासाठीच्या मंजुर अनुदानातुन सदर खर्च भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .या संदर्भात निर्गमित करण्यात सविस्तर शासन निर्णय ( GR ) डाऊनलोड करण्याकरीता खाली नमुद लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *