Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Old Pension Scheme ] : राज्यातील विद्यमान सरकार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तयार नाहीत पण राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल करण्याचा पर्याय शोधत आहेत , ज्यामुळे कर्मचाऱ्यांना व राज्य सरकारचे देखिल आर्थिक हित जोपासले जाईल .
दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून राज्यातील तब्बल 17 लाख शासकीय / निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन जशाच्या तशी लागु करण्यात यावी या मागणीकरीता नागपुर येथे बेमुदत संप करणार आहेत . या आंदोलनामध्ये राज्यातील राजपत्रित अधिकारी सहभागी होण्यासाठी दिनांक 12 डिसेंबर रोजी अधिकृत्त निर्णय घेणार आहेत .
आगामी लोकसभा / विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता सरकारकडून देखिल कर्मचाऱ्यांना खुश करायचे असल्याने जुनी पेन्शन व राष्ट्रीय पेन्शन योजना यांमध्ये सुवर्णमध्ये साधून नविन पेन्शन प्रणाली राज्य सरकारकडून अस्थित्वात आणण्यात येणार आहेत .यासाठी राज्य सरकारपुढे काही उत्तम पर्याय आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
आंध्र प्रदेश राज्याची गॅरंटेड पेन्शन प्रणाली : आंध्र प्रदेश राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व NPS पेन्शन प्रणालीतुन उत्तम सुवर्णमध्ये साधला आहे . आंध्र प्रदेश राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर मुळ वेतनाच्या 40 टक्के रक्कम व त्यावर महागाई भत्ता देण्यात येत असे , कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार 40 टक्के वरुन मुळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम + महागाई भत्ता अशी पेन्शन देण्यात येत आहे . परंतु यांमध्ये कर्मचाऱ्यांकडुन देखिल योगदान घेतले जाते .
यांमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना मधील कर्मचारी योगदान आंध्र प्रदेश सरकारने सुरुच ठेवले आहेत , निवृत्तीनंतर जमा रक्कमेचा वापर निवृत्तीवेतन म्हणून अदा करण्यात येते . यांमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजनेत रक्कम कमी असेल अशा वेळी उर्वरित रक्कम ही राज्य सरकारकडून अदा करण्यात येते . यामुळे या पेन्शन योजनेस गॅरंटेड पेन्शन योजना असे म्हटले जाते .
जमा रक्कमेच्या परताव्यातुन निवृत्तीवेतन : राष्ट्रीय पेन्शन योजनामधील जमा रक्कम मधील 60 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांस निवृत्तीनंतर परत करते , तर उर्वरित 40 टक्के रक्कम शासन स्वत: कडे ठेवते , सदर ठेवीची गुंतवणुक करुन मिळणाऱ्या व्याजांमधेन पेन्शन सध्य स्थितीमध्ये देण्यात येते . तर असे न करता कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येणारे योगदान पुर्वीपासूनच स्थिर गुंतवणुक योजनांमध्ये जसे कि , अटल पेन्शन योजना या सारख्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणुक केल्यास कर्मचाऱ्यांस निवृत्तीनंतर अधिक परतावा मिळेल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.