Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Pension Mahamorcha ] : राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचारी दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी नागपुर येथे विधान भवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चास उपस्थित राहणार आहेत . यांमध्ये राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी युनियन मार्फत दिनांक 09 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात ..

सदर प्रसिद्धीपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या राज्याच्या विस्तारीत केंद्रीय कार्यकारणीच्या सभेस महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना , जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना व जिल्हा परिषद वाहन कर्मचारी संघटनांची राज्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .

सदर बैठकीत दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी नागपुरच्या विधान भवनावर जो जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने पेन्शन जनक्रांती महामोर्चाचे आंदोलन सन 2005 नंतर सेवेत रुजु झालेल्या सर्वच संवर्गातील कर्मचाऱ्यांना पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागु करणे या एकमेव मागणीसाठी हे आंदोलन पुकारले आहे .सदर आंदोलनांस सर्व कर्मचाऱ्यांचा सक्रिय जाहीर पाठींबा असून , बहुतांश कर्मचारी मोर्चास उपस्थित राहणार आहेत .

या शिवाय शासन स्तरावर प्रलंबित अनेक मागण्या विना निर्णय पडून आहेत त्याचे स्वतंत्र निवेदन यापूर्वीच म्हणजेच दिनांक 01 नोव्हेंबर 2023 रोजी शासनास ईमेलद्वारे सादर केले असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

मार्च 2023 च्या राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलनाच्या वेळी प्रतिनिधी मंडळासमवेत झालेल्या चर्चेत ठरल्या नुसार , जुनी पेन्शन लागु करण्याविषयी जी मा. सुबोधकुमार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नियुक्त केली आहे , त्यावरही सकारात्मक निर्णय गेल्या सात महिन्यांपासून घेण्यात आला नाही . व ही मागणी विना निर्णय शासन पातळीवर प्रलंबित आहे .

सदर समितीने शासनाला आपला अहवाल सादर केला आहे तेव्हा कृपया शासन पातळीवर यावर जलद गतीने निर्णय होऊन मागणीनुसार , सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ताबडतोब पुर्वलक्षी प्रभावाने लागु करावी अशी आग्रही मागणी सदर प्रसिद्धीपत्रकान्वये करण्यात आलेली आहे . या संदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *