Live Marathipepar संगिता पवार [ State Employee Today IMP Shasan Nirnay ] : राज्य कर्मचारी संदर्भात आज दिनांक 08 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार , अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्ते यावरील खर्च करीता अनुदानाचे वितरण करण्यात आलेले आहेत .
सन 2023-24 या आर्थिक वर्षात जल जीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते यावरील पुढील कालावधीचा खर्च भागविण्यासाठी रुपये 6.59 कोटी ( अक्षरी – सहा कोटी एकोणसाठी लाख रुपये ) फक्त इतके अनुदान मिशन संचालक , राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांना या शासन निर्णयाद्वारे मुक्त करण्यात येत आहेत .
जल जीवन मिशन अंतर्गत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी / कर्मचारी यांचे वेतन व भत्ते याकरीता सदर शासन निर्णयांमध्ये नमुद लेखाशिर्षाखाली अनुदान वितरित करतेवेळी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियम / सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
वित्त विभाग शासन परिपत्रक दि.12.04.2023 मधील तरतुदीचे कटाक्षाने पालन करण्याचे तसेच वित्त विभागांकडून वेळोवेळी प्राप्त होणऱ्या निर्देशानुसार , प्रत्यक्ष खर्चाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदरचे सहायक अनुदान वेतनासाठी असल्याने वित्त विभागाच्या दिनांक 12 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार ते बिनशर्त स्वरुपाचे असणार आहेत .
यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्यांचे देयक विहीत कालावधीमध्ये अदा करण्यात येईल . या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांमार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.