Spread the love

Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee December Month Payment Shasan Paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2023 चे शालार्थ वेतन देयके सादर करतांना देयके सादर करण्याची कार्यपद्धतीबाबत जिल्हा परिषद यवतमाळ मार्फत राज्य शासनांच्या उप सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या दिनांक 14.09.2023 रोजीच्या संदर्भाधिन पत्राच्या अनुषगांने परित्रक सादर करण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेच्या बाबतीत माहे डिसेंबर 2023 चे वेतन हे CMP प्रणाली द्वारे थेट कोषागार कार्यालयातुन शिक्षकांच्या खात्यांमध्ये जमा करणेबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत .यामुळे संबंधित कार्यालय प्रमुखांना कर्मचाऱ्यांचे खाते क्रमांक तसेच आयएफसी कोड तसेच प्रान क्रमांक योग्य असल्याचे खात्री करण्यात निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर माहे डिसेंबर 2023 च्या वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता 46 टक्के झाल्याबाबतची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच माहे जुलै 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीचा 4 टक्के महागाई भत्ता थकबाकी फरक डी.ए अरिअर्स टॅब मध्ये टाकुन महागाई भत्ता थकबाकी पेक्षा जादा रक्कम आढळल्यास देयके नामंजुर करण्यात येईल याकडे लक्ष देण्यात निर्देश देण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना प्रान नंबर मिळालेले आहेत त्यांची माहे डिसेंबर 2023 च्या वेतनामधून नियमित NPS कपात करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच जे NPS कर्मचारी सदर माहे डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येवू नयेत तसेच ज्या शिक्षकांची GPF कपात आहे ते सेवानिवृत्त होत असल्यास , तीन महिने आधी भविष्य निर्वाह निधी कपात करण्यात येवू नये असे निर्देश देण्यात आले आहेत .

तसेच शालार्थ प्रणालीमध्ये झालेल्या नविन बदलानुसार , यानंतर मुळ वेतन , महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता तसेच NPS रक्कम या व्यातिरिक्त सर्व टॅब हे बंद करण्यात आलेले आहेत .या संदर्भात शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या दि.06.12.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *