Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी , [ Government Employee Karyamulyamapan Ahaval GR ] : महाराष्ट्र राज्‍य शासन सेवेतील शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही दिनांक 31 डिसेंबर पर्यंत पुर्ण करणेबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील सरकारी अधिकारी / कर्मचारी यांचे प्रत्यंक वर्षी कार्यमुल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपुर्ण कार्यवाही दिनांक 31 डिसेंबर पर्यंत पुर्ण करण्यात यावीत , अशा प्रकारच्या सुचना ह्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या आहेत .

तसेच सदर परिपत्रकानुसार कार्यमुल्यमापन अहवाल वेळेत लिहिले जात नाहीत असे राज्य शासनांच्या निदर्शनास आलेले आहेत . त्यामुळे सदरची बाब विचारात घेता राज्यातील सर्व आस्थापना / संस्करण अधिकाऱ्यांनी दिनांक 17 नोव्हेंबर 2022 मध्ये दिलेल्या सूचना विचारात घेवून प्रतिवेतन वर्ष सन 2022-23 या वर्षांचे कार्यमुल्यमान अहवाल विहीत वेळेत म्हणजेच दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत पुर्ण करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच कार्यमुल्यमापन अहवालाच्या अनुषंगाने करावयाची संपुर्ण कार्यवाही विहीत मुदत मध्ये केली जाईल याची संपुर्ण जबाबदारी ही संबंधित आस्थापना / संस्करण अधिकारी यांची असणार आहे , अशा सुचना सदर  शासन निर्णयांनुसार देण्यात आलेल्या आहेत .

सदर कार्यमुल्यमापन अहवाल विहीत मुदत मध्ये पुर्ण करणेबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *