Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Loan Agrim Shasan Nirnay ] : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना कर्मचारी इत्यादींना कर्जे या खालील उपशिर्ष , मोटारवाहन खरेदी अग्रिमे , नविन मोटार सायकल खरेदी अग्रिम वाटप करण्याकरीता विधी व न्याय विभागांकडून दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे या खालील उपशिर्ष 202 मोटार वाहन खरेदीसाठी अग्रिम ( दत्तमत ) मोटार वाहन खरेदी अग्रिमे याकरीता सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी मंजुर रुपये 1,00,000/- अक्षरी – रुपये एक कोटी फक्त अनुदानातून ज्ञापनानुसार 5,50,000/- आणि 2,00,000/- असे एकुण 7,50,000/- इतके अनुदान प्रमाणित करण्यात आलेले आहेत . या ज्ञापनानुसार निर्णयांमध्ये दिलेल्या विवरण पत्रांनुसार सात लाख अकरा हजार रुपये फक्त इतका निधी निर्णयातील नमुद अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रमाणित करण्यास शासनांची मंजुरी देण्यात येत आहेत .
सदर निर्णयांमध्ये नमदु करण्यात आलेले आहेत कि , अर्जदार खरेदी करणार असलेली मोटार वाहनाची किंमत ही प्रमाणित करण्यात आलेल्या अग्रिमापेक्षा कमी असल्यास , शिल्लक उरणारी रक्कम तात्काळ शासनास परत करुन तसे शासनांस अवगत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच अर्जदाराच्या नावासमोर जेवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे , तेवढीच रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच नविन मोटार सायकल खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिमाची वसूली व्याजासह 60 समान मासिक हप्यांमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच प्रथम 48 मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल व नंतर 12 मासिक हप्त्यांमध्ये व्याज वसूल करण्यात येणार आहेत . तर नविन स्कुटर खरेदी करण्यासाठी मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रीमाची वसुली व्याजासह 48 समान मासिक हप्यांमध्ये करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर प्रथम 36 मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल व नंतर 12 मासिक हप्त्यांमध्ये व्याज वसूल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर देण्यात आलेल्या अग्रिम व्याजाचा दर राज्य शासनांच्या वित्त विभाग शासन निर्णय क्र. अग्रिम 2022 विनियम दिनांक 09.11.2023 नुसार मोटार सायकल / स्कुटर / मोपेड करीता मंजूर करण्यात येणाऱ्या अग्रिम प्रकरणी व्याजाची परिगणना वार्षिक 9 टक्के दराने करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.