Live Marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA Arrears Shasan Paripatrak ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचारी , तसेच इतर पात्र कर्मचारी , निमशासकीय कर्मचारी ( जिल्हा परिषद ) कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर महिन्यांच्या वेतन देयकासोबत देणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला आहे .
यांमध्ये कर्मचाऱ्यांना डी.ए थकबाकी अदा करणेबाबत , राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक , शिक्षणाधिकारी तसेच अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाध निधी पथक यांना शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुर्ण यांच्या कडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकाला वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 23.11.2023 रोजीचा संदर्भ देण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , वित्त विभागाचे दिनांक 23.11.2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमुद निर्णयानुसार महागाई भत्यांमध्ये ( DA ) सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्याची थकबाकी ( DA Arrears ) देणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात शिक्षण उपसंचालक ( प्राथमिक ) यांच्यामार्फत दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.