Live Marathipepar संगिता पवार [ Government Employee DA Rate Increace By 5% ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वर्षात मोठी भेट प्राप्त होणार आहे , ती म्हणजे महागाई भत्ता ( DA ) मध्ये पाच टक्के पर्यंत वाढ करण्यात येणार आहेत , यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता हा 50 टक्के पार करेल , या संदर्भातील आत्ताची नविन अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात ..
सध्या माहे जुलै 2023 पासुन केंद्रीय तसेच राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे . यांमध्ये आता दि.01 जोनवारी 2023 मध्ये पुन्हा डी.ए वाढ असल्याने यावेळी डी.ए मध्ये पाच टक्के पर्यंत वाढ करण्यात येणार असल्याची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे .ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता हा 51 टक्के म्हणजेच 50 टक्के पार होणार आहे .
सध्याची वाढती महागाईचे दर तसेच माहे एप्रिल / मे महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने , विद्यमान केंद्र सरकारचे हे शेवटची डी.ए वाढ निर्णय आहे . यामुळे विद्यमान मोदी सरकारकडून देशातील 45 लाख सरकारी कर्मचारी तसेच 40 लाख पेन्शनधारकांना मोठी भेट देण्यात येणार आहे .
महागाई भत्ता वाढ कधी लागु होईल : प्रत्येक वेळी महागाई भत्ता वाढ बाबतचा निर्णय हा प्रशासनांकडून नियोजित कालावधीपेक्षा उशिराच होतो . परंतु यावेळी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल -मे महिन्यांत नियोजित असल्याने , आचासंहिता तीन महिने पुर्वी लागतात यामुळे माहे जानेवारी महिन्यांत याबाबत अधिकृत निर्णय घेण्यात येईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.