Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Madhy Pradesh , Rajasthan , Chattisagadh , Telangana Election Result 2023 ] : मध्ये प्रदेश , राजस्थान , छत्तीसगढ , तेलंगणा या राज्यांच्या नुकतेच विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या होत्या , सदर विधानसभेचा निकाल काल दिनांक 03.12.2023 रोजी जाहीर झाला . सविस्तर राज्यनिहाय निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

मध्ये प्रदेश : मध्ये प्रदेश राज्यांमध्ये विधानसभेच्या एकुण 230 जागा असून , यापैकी भारतीय जनता पार्टीने 163 जागा , राष्ट्रीय काँगेसने 66 जागा इतर पक्ष ( अपक्ष ) ने 01 जागा जिंकल्या असून , भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे .

राजस्थान : राजस्थान राज्यांमध्ये विधानसभेच्या एकुण 197 जागेसाठी निवडणुका संपन्न झाल्य असून , यापैकी भारतीय जनता पार्टीने 115 जागा , राष्ट्रीय काँगेसने 69 जागा तर इतर अपक्षाने 11 जागा तर बीएसपीने 02 जागेवर विजय संपादन केले आहेत . यांमध्ये भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे .

छत्तीसगढ : छत्तीसगड राज्यांमध्ये विधानसभेच्या एकुण 90 जागेवर निवडणुका झाल्या असून यापैकी 54 जागेवर भारतीय जनता पार्टीने तर 35 जागा राष्ट्रीय काँग्रेसने इतर अपक्षने 01 जागेवर विजय मिळवला असून सत्ता स्थापनेसाठी 46 जागेवर विजय आवश्यक असल्याने भारतीय जनता पार्टीची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे .

तेलंगणा : तेलंगणा राज्यांमध्ये 119 जागेवर विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या , यापैकी 64 जागेवर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने तर बीआरएस ने 39 जागा तर भारतीय जनता पार्टीने 08 जागा इतर अपक्षांने 08 जागेवर विजय मिळवला आहे . यांमध्ये राष्ट्रीय कॉग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *