Spread the love

एचडीएफसी बँक मार्फत सन 2023-24 करीता इयत्ता 1 ली ते पदवीव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी विहीत मुदत मध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत .शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक पात्रता , शिष्यवृत्ती रक्कम , अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

आवश्यक पात्रता : यांमध्ये उमेदवार हे पदवी / पदव्युत्तर पदवी तसेच इयत्ता 01 ली ते 12 वी ( डिप्लोमा / आयटीआय अभ्यासक्रमांचा समावेश ) मध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकणार आहेत . तसेच  विद्यार्थ्यांने मागील शैक्षणिक अभ्यासक्रम / इयत्तेमध्ये 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक असणार आहेत .

त्याचबरोबर उमेदाराच्या पालकाचे मागील वर्षाचे उत्पन्न हे 2,50,000/- लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवार हे भारत देशातील रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत .

शिष्यवृत्ती रक्कम : शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार अनुज्ञेय असणार आहे . इयत्ता / अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम पुढील तक्त्याप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रइयत्ता / अभ्यासक्रमशिष्यवृत्ती रक्कम
01.पदव्युत्तर पदवी ( जनरल )35,000/-
02.पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल )75,000/-
03.पदवी ( जनरल )30,000/-
04.पदवी ( प्रोफेशनल )50,000/-
05.आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा18,000/-
06.इयत्ता 7 वी ते 12 वी पर्यंत18,000/-
07.इयत्ता 1 ली ते 6 वी पर्यंत15,000/-

आवश्यक कागतपत्रे : सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे पासपोर्ट साईट फोटो , मागील वर्षाचे गुणपत्रक , आधार कार्ड / मतदान कार्ड / वाहन चालविण्याचा परवाना , चालु वर्षाचे ( सन 2023-24 चे )  शाळा / महाविद्यालयाचे ओळखपत्र / बोनाफाईट  / फीस पावती , उत्पनाचा दाखला इ.

अर्ज प्रक्रिया  :  पात्र विद्यार्थ्यांनी खाली नमुद संकेतस्थळावर दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

सविस्तर माहितीसाठी / ऑनलाईन आवेदन सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

APPLY NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *