Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनीधी [ New Pay Commission New Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा / नविन वेतन आयोग स्थापन करणे संदर्भात केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत , या संदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे पाहुयात ..

माहे एप्रिल -मे महिन्यांमध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्याने , कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न सोडविले जात आहेत .  तसेच नविन वेतन आयोग लागु संदर्भात कर्मचाऱ्यांना आशा आहे कि , पुढील वर्षांमध्ये आठवा वेतन आयोगाची स्थापना केंद्र सरकारकडून करण्यात येईल . जेणेकरुन कर्मचाऱ्यांना सन 2026 पर्यंत सुधरित वेतनश्रेणीचा लाभ प्राप्त होईल .

या संदर्भात केंद्रीय वित्त विभागाकडून मोठी अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा / नविन वेतन आयोग स्थापन करणेबाबतची कोणतही योजना सध्य स्थितीमध्ये वित्त विभागांकडून प्रस्तावित नाही . अशी माहिती केंद्रीय वित्त विभागाचे सचिव टी.व्ही. सोमनाथन यांनी दिली आहे .

यापुर्वीचा इतिहास पाहीला असता , सन 2013 मध्ये , देशतील काही राज्यांच्या विधानसभा तसेच सन 2014 च्या सार्वत्रिक निवडणुका होण्याच्या काही महिन्यापुर्वीच काँग्रेस व युक्ती पक्षाच्या सरकारने सातवा वेतन आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती .

यानुसार आता पुढील 02 महिन्यांत नविन वेतन आयोगाची स्थापना केंद्र सरकारकडून करु शकते . नंतर निवडणुकांच्या आचारसंहिता लागु झाल्यास , अशा प्रकारचा निर्णय सरकारला घेता येणार नाही .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *