Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 10 ,20,30 Year Pragati Yojana ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना अंतर्गत 10 , 20 आणि 30 वर्षाची वेतनश्रेणी लागु करणेबाबत विद्यमान आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन सादर केले आहेत .
राज्य शासन सेवेत कार्यरत प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांनुसार , आश्वासित प्रगती योजना अंतर्गत 10 , 20 आणि 30 वर्षांची वेतनश्रेणी लागु करण्याची मागणी नागपुर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. सुधाकर अडबाले यांनी राज्यचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व राज्याचे वित्तमंत्री मा. अजितदादा पवार तसेच शालेय शिक्षण विभागाचे मंत्री मा. दिपक केसरकर यांना निवेदन सादर केले आहेत .
राज्यातील कर्मचाऱ्यांना 10 , 20 व 30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागु करावी याकरीता कर्मचारी संघटनांकडून वारंवार राज्य शासनांस पाठपुरावा करुनही लागु करण्यात येत नाहीत . यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे .
केंद्र सरकारी कर्मचारी तसेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनाचा लाभ ज्याप्रमाणे मिळतो आहे , त्याच धर्तीवर राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येणारे शासकीय , आश्रमशाळा ,स्वराज्य संस्था , खासगी अनुदानित , तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागु करण्याचे निवेदन देण्यात आलेले आहेत .
राज्यातील शालेय शिक्षण तसेच इतर पात्र कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागु करावित याकरीता आमदार सुधाकर अडबाले यांनी विधीमंडळांमध्ये वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत . यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे आश्वासित प्रगती योजना बाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.