Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी, [7th Pay commission varification booklet] : सातवा वेतन आयोगानुसार वेतन पडताळणीच्या संदर्भातील आक्षेपाबाबत मार्गदर्शक पुस्तिका वित्त विभाग संचालनालय लेखा व कोषागर महाराष्ट्र राज्य मुंबई , मार्फत फेब्रुवारी 2021 मध्ये परिपूर्ण वेतन पडताळणी मार्गदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली आहे .

सतत पडताळणी मार्गदर्शक पुस्तिका चा मुख्य उद्देश म्हणजे वेतन पडताळणी पथकाकडून लागणाऱ्या आक्षेपाची संख्या कमी व्हावी तसेच राज्यांतील कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील अधिक माहिती मिळावी , म्हणून ही वेतन पडताळणी मार्गदर्शिका वित्त विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या मार्गदर्शिका मध्ये सेवा पुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी भाग अ व ब नमूद करण्यात आले आहे .

त्याचबरोबर वेतन वेतन निश्चितीचे प्रसंग तसेच विकल्प, सातवा वेतन आयोग ,आश्वासित प्रगती योजना ,वेतन निश्चिती ,पडताळणीसाठी तांत्रिक सूचना ,त्याचबरोबर सेवापुस्तकाची वेतन पडताळणी करताना लावण्यात येणारे सर्वसाधारण आक्षेप या पडताळणी पुस्तिकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत .

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामध्ये तीन लाखांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना : महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 02 मार्च 2019 नुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे , सदर योजना दिनांक 01 जानेवारी 2016 पासून अमलात आली आहे . सातवा वेतन आयोगातील वेतन स्तर एस – 20 पर्यंत वेतन घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू असणार आहेत. या योजनेतील पात्र अधिकारी / कर्मचारी यांना संपूर्ण सेवेत पात्रतेनुसार तीन वेळा लाभ मंजूर करण्यात येईल .

या संदर्भात वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर मार्गदर्शिका पुस्तिका पुढीप्रमाणे पाहु शकता ..

वेतन पडताळणी मार्गदर्शक पुस्तिका

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *