Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Employee Payment Shasan Nirnay ] : शासनाचे नियमित अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनाकरीता आवश्यक निधींचे वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या कृषी पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांकडून दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
शासनाचे नियमित अधिकारी / कर्मचारी वेतनाकरीता रक्कम रुपये 700.00 लाख निधीची तरतुद पुरवणी मागणीद्वारे करण्यात आली होती . सदर पुरवणी मागणी जुलै 2023 च्या हिवाळी अधिवेशनांमध्ये मान्य करण्यात आली आहे .
राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करिता सहाय्यक अंतर्गत लेखाशिर्ष 24014436 अंतर्गत सहाय्यक अनुदाने ( वेतन ) अंतर्गत कार्यरत शासनाचे नियमित अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनाकरीता आर्थिक वर्ष 2023-24 करीता आवश्यक असलेली रुपये 4.90 कोटी इतकी रक्कम आयुक्त ( कृषी ) यांना अर्थसंकल्पिय प्रणालीवर वितरीत करण्यास सदर शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे .
सदरच्या चालु वर्षी मागणी क्रमांक डी-3 2401 पीक संवर्धन 109 विस्तार व शेतकरी प्रशिक्षण 01 माहिती व प्रचार 01 43 कृषी उन्नती योजना – कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करण्याकरीता सहाय्यक उप अभियान राज्य हिस्सा 40 टक्के , 36 सहाय्यक अनुदाने या लेखाशिर्षाखालील खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये आयुक्तालय स्तरावर आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे यांच्या नियंत्रणाखाली आहरण व संवितरीत निधी जिल्हा स्तरावर संबंधित प्रकल्प संचालक आत्मा यांच्या नियत्रणांखाली निधीचे नितरण करण्यात येत आहेत .सदर योजना अंतर्गत सन 2023-24 मध्ये वितरीत केलेल्या निधीचे लेखा परिक्षित केलेली उपयोगिता प्रमाणपत्रे सत्वर सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात कृषी , पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांकडून दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत.
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.