लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : येत्या काही आठवड्यांमध्येच सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता DA ची बातमी समोर येत आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांकरिता प्रशासनाने एक नवीन अपडेट काढले असून आता त्या अपडेट च्या माध्यमातून आपल्याला असे समजले आहे की शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होईल. त्यामध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या 31 मे पर्यंत पुन्हा एकदा महागाई भत्त्याची घोषणा होईल.
महागाई भत्ता चे संपूर्ण अपडेट 31 मे च्या संध्याकाळी प्रदर्शित केले जाईल याचा अर्थ असा आहे की एआयसीपी च्या निर्देशकाचे नवीन आकडे येणार आहेत. त्यानंतर पुढे महागाई भत्ता किती वाढला हे आपल्याला समजेल. आतापर्यंत बघितले तर ए आय सी पी आय चे अपडेट म्हटले तर एप्रिल 2023 असा नंबर पुढे यायचा त्यामुळे वाड्याचे चित्र अधिक स्पष्टपणे दिसत होते. परंतु आतापर्यंत निर्देशांक बघितला तर त्यांचे आकडेवारी 45% च्या जवळ पोहोचली आहे. जुलै च्या अंतिम टप्प्यांमध्ये ही आकडेवारी आपल्याला चार टक्क्यांनी वाढवून मिळेल.
महागाई भत्त्यात किती होणार वाढ ? सध्याचा थोडक्यात हिशोब आपण बघितला तर महागाई भत्त्याच्या डी ए मध्ये वाढ होऊन 44% पर्यंत पोहोचला आहे. फेब्रुवारी महिन्यात 43% इतका होता आता पुढे मे महिन्यानंतर जून महिन्याचे आकडे येणे बाकीच आहेत. जानेवारीपासून मार्च महिन्याच्या कालावधीमध्ये हीच आकडेवारी दोन टक्क्यांनी वाढली आहे.
हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ !
वास्तविकपणे बघायचे झाले तर डिसेंबरचा जो काही निर्देशांक बघितला तर 132 होता त्यावेळी महागाई भत्ता हा एकूण 42 टक्के इतका होता. परंतु मार्च महिन्याच्या आकडेवारी 133 वर जो काही निर्देशांक होता तो पोहोचला असून महागाई भत्त्याच्या स्कोर हा 44 टक्क्यांवर पोहोचला. तरी पण ही गणना आधार म्हणून घेतली तर जून पर्यंत जो काही निर्देशांक असेल तो दोन टक्क्यांनी वाढेल म्हणजे महागाई भत्ता 46% पर्यंत पोहोचण्याची शक्यता दिसत आहे.
यामुळेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये बंपर वाढ होणार आहे. कारण की यंदाच्या वर्षी जो काही महागाई भत्ता असेल तो 50% च्या पुढे जाईल जुलै महिन्याच्या आकडेवारीकडे बघितले तर महागाई भत्ता हा पूर्णपणे चार टक्क्यांनी वाढून 46 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. जर 2024 मध्ये हा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला तर तो 50% पर्यंत नक्कीच पोहोचेल.
हे पण वाचा : नविन वेतन आयोगाबाबत आली , मोठी आनंदाची बातमी !
अशा परिस्थितीमध्ये आता पुढे महागाई भत्ता पुन्हा एकदा शून्यापासून सुरू होईल. जेव्हा प्रशासनाने त्यांचे आधारभूत वर्ष बदलले होते त्यावेळी पासून हा नियम लागू केला होता. म्हणजेच 50% पर्यंत महागाई भत्ता असलेल्या वेळेत तो शून्य केला जाईल आणि तिथून पुढे मूळ वेतन मान त्या ठिकाणी जोडण्यात येईल म्हणजे पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात होईल.
आपण जर शासकीय – निमशासकीय , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी असाल तर whatsapp Group मध्ये सामील व्हा !