Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ SBIF ASHA SCHOLARSHIP FOR STUDENT 2023] :  शालेय विद्यार्थ्यांसाठी एसबीआयएफ ची आशा शिष्यवृत्ती योजना 2023 करीता इयत्ता 06 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजु विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . योजनाची पात्रता , अर्ज प्रक्रिया ,  शिष्यवृत्ती आर्थिक लाभ या संदर्भात सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

शिष्यवृत्ती योजनाविषयी : ही शिष्यवृत्ती एसबीआय फाउंडेशन मार्फत शालेय शिक्षण इयत्ता 06 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या गरजु विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्‍य करण्याच्या उद्देशाने शिष्यवृत्ती देण्यात येते . या योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे जाणुन घेवूयात .

पात्रता : या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा इ.06 वी ते 12 वी इयत्तेत शिक्षण घेत असावा . तसेच विद्यार्थ्यांस मागच्या इयत्तेत 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळणे आवश्यक असणार आहेत . तसेच विद्यार्थ्याच्या पालकाचे मागच्या वर्षाचे उत्पन्न हे 3,00,000/- रुपये पेक्षा पेक्षा कमी असावेत . तसेच विद्यार्थी हे भारतीय रहिवाशी व देशांमध्ये शिक्षण घेत असावेत .

आर्थिक लाभ : सदर शिष्यवृत्तीकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांस एका वर्षांकरीता 10,000/- रुपये शिष्यवृत्ती रक्कम म्हणून विद्यार्थ्यांच्या  बँक खात्यामध्ये जमा केली जाते .

आवश्यक कागतपत्रे : सदर शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी मागील वर्षांचे गुणपत्रक , आधार कार्ड , चालु वर्षाचे बोनाफाईड / ओळखपत्र / फीस पावती , बँक खाते नंबर , उत्पनाचे प्रमाणपत्र , पासपोर्ट साईज फोटो कागतपत्रे आवश्यक आहेत .

असा करा आवेदन : सदर पात्रता असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले आवेदन हे sbi-asha-scholarship-program-apply-now या संकेतस्थळावर दिनांक 30.11.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *