Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Phone Pay , Google Pay , Pytme etc. Payment Apps Stop News ] : देशांमध्ये फोन पे , गुगल पे , पेटीएम इ. पेमेंट ॲप्स हे दिनांक 31 डिसेंबर 2023 पासून बंद होणार आहेत , या संदर्भात एनपीसीआय कडून निर्देश जारी करण्यात आलेले आहेत , याचे सविस्तर कारण पुढीलप्रमाणे पाहूयात .
वरील पेमेंट ॲप्स साठी मोबाईल नंबर हा महत्वाचा आहे , मोबाईल नंबरवर युपीआयडी लिंक केली जाते . अनेक प्रकरणांमध्ये वापकर्ते हे नविन नंबर घेतात तर जुना नंबर असणारे पेमेंट युपीआयडी डिलिंक न करता नविन युपीआयडी नविन नंबरवर तयार करतात यामुळे अशा वापरकर्त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होवू शकते . यामुळे NPCI कडून सदर फरवणूकीपासून बचावासाठी सदर जुना युपीआयडीचे सर्व व्यवहार दिनांक 31 डिसेंबर 2023 पासून बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास , एखादा वापरकर्ता हा पेटीएम ॲप्स वर पेमेंट युपीआयडी तयार करतो , परंतु कालांतरणाने नविन नंबर घेतल्यास त्यावर नविन युपीआयडी तयार करतो परंतु जुना युपीआयडी डिलिंक करणे आवश्यक असते . यामुळे सदर वापरकत्यांची फसवणुक होवू शकते . तसेच जुन्या नंबरवर पेटीएम पेमेंट खाते / एयरटेल पेमेंट खाते असते जे वापरकर्ता नंबर बदलला तर त्यावर जुनाच युपीआयडी कार्यरत असते , यामुळे सदर जुने युपीआय आयडी बंद करण्यात येणार आहेत .
NPCI : ( National Payment Corporation of India ) ही एक प्रकारची ना नफा संस्था असून भारतातील रिटेल पेमेंट तसेच सेटलमेंट सेवा म्हणून कार्यरत आहे . याच्या निर्देशांच्या आधारावरच फोनपे , गुगल पे , पेटीएम इ.पेमेंट ॲप्स कार्य करते .
हे फोनपे , गुगल पे , पेटीएम बंद होणार : ज्या वापकर्तांचे खाते ( यांमध्ये पेमेंट खात्यांचा देखिल समोवश असणार आहे ) हे एक वर्षांपासून बंद आहेत / एक वर्षांपासून ज्यांच्या युपीआयडी वरुन कोणताही व्यवहार झालेला नाही अशांचे फोनपे , गुगल पे , पेटीएम इ. युपीआयडी दि.31.12.2023 पासून बंद होणार आहेत .न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर NPCI कडून सदर निर्णय घेण्यात आलेला आहे .