Live Marathipepar , संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Shasan Nirnay ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय वित्त विभागांकडून निर्गमित करण्यात आला आहे . यांमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभाच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्टीकरणे देण्यात आले आहेत .
परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास , त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतुन निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आलेले आहेत .
सदर शासन निर्णयान्वये शासन शुद्धीपत्रक काढून राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 24.08.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या GR मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , परिशिष्ट – 01 मधील ब – 1 येथे मुद्दा क्रमांक 1.6 मध्ये उपशिर्ष 12 ऐवजी 14 असे वाचण्यात यावेत . परिपत्रकात नमुद शासनाचे अंशदान , त्यावरील व्याज व सानुग्रह अनुदानाच्या सांकेतांक 71024401 ऐवजी 0071024401 , 71025301 ऐवजी 0071025301 व 49513401 ऐवजी 0049513401 असे वाचण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
परिशिष्ट -2 मधील ब -1 येथे मुद्दा क्र.1.4 मध्ये रुग्णता सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या प्रान खत्यामध्ये जमा एकूण संचित रकमेतील शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याबाबतचा तपशिल संबंधित कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी यांनी अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांचेकडून प्राप्त करुन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात वित्त विभागांकडून दि.20.11.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन शुद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
तर वित्त विभागांकडून दि.24.08.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.