Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Demand Meeting ] : राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीचे इतिवृत्त सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत .
राज्यातील राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी गड ड ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी मध्यवती महासंघ , महाराष्ट्र यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात मा. मुख्य सचिव यांचे समिती कक्ष येथे आयोजित करण्यात आलेली होती .
राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी गड ड ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ , महाराष्ट्र यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिनांक 06.11.2023 रोजी मा.मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयीन दालनात अपर मुख्य ( सचिव ) , अपर मख्य सचिव ( वित्त ) व सचिव( साविस ) यांच्य उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आलेली होती .
बैठकीचे सविस्तर इतिवृत्त पाहा सविस्तर
सदर बैठकीत विविध 31 प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली . तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांकडे महत्वाच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक प्रस्तावित करण्यात येईल , असे बैठकीत नमुद करण्यात आले . तसेच बैठकीच्या शेवटी मा. मुख्य सचिव यांनी सर्व संघटनांच्या अधिकारी / पदांधिकाऱ्यांनी या संदर्भात संघटनेच्या सर्व सदस्यांशी विचारविनियम करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहेत .
राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या मागण्या व बैठकीत मा.मुख्य सचिव महोदयांनी दिलेले निर्देश व कार्यवाही करण्यात येणारे विभाग या संदर्भात सविस्तर बैठकीचे सविस्तर इतिवृत्त पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
विविध मागणीचे सविस्तर इतिवृत्त (मागणी व कार्यवाही ) PDF
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.