Spread the love

शासन निर्णय वित्त विभाग : सातव्या वेतन आयोगांमध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 02 मार्च 2019 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सविस्तर शासन निर्णय ( Shasan Nirnay ) पुढीलप्रमाणे पाहुयात .

वित्त विभागांकडुन सातव्या वेतन आयोगानुसार 10 , 20 आणि 30 वर्षांच्या नियमित सेवेनंतर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हे दिनांक 01 जानेवारी 2016 पासून अंमलात येणार आहेत .सुधारित आश्वासित प्रगती योजना ही वेतन मॅट्रीक्समधील वेतनस्तर S -20 पर्यंत तर सहाव्या वेतन आयोगातील वेतन बँड 15,600-39,100/- व ग्रेड पे रुपये 5,400/- या वेतन संरचनेशी समकक्ष अधिकारी / कर्मचारी यांना लागु असणार आहेत .

सदर आश्वासित प्रगती योजनाखाली पात्र असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना संपुर्ण सेवा काळात तीन वेळा सदर योजनेचा लाभ लागु होईल . यासाठी अधिकारी / कर्मचाऱ्यांची अर्हता , ज्येष्ठता , पात्रता , अर्हता परीक्षा तसेच विभागीय परीक्षा तसेच गोपनिय अहवालाची प्रतवारी , विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे जातीवैधता प्रमाणपत्र उपलब्ध असणे  अशा बाबी विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पुर्तता करणे आवश्यक असणार आहेत .

पुर्वी 12 , 24 वर्षांच्या सेवेनंतर मिळणारे लाभ तसेच 7 व्या वेतन आयोगांमध्ये दहा , वीस , तीस वर्षांच्या सेवेनंतर अर्हतानुसार अनुज्ञेय करण्यात येणार आहेत . या कारणांमुळे जे अधिकारी / कर्मचारी यांना दिनांक 01 जानेवारी 2016 पुर्वी अनुज्ञेयतेनुसार 1 ला व 2 लाभ मंजुर झालेला आहे , अशा कर्मचारी / अधिकारी यांना उर्वरित लाभ पुढीलप्रमाणे लागु करण्यात येईल .

एकाकी पद तसेच एकमेव संवर्ग असलेल्या पदावरील प्रकरणी तसेच विभागात पदोन्नतीची वेतनश्रेणी नसलेल्या एकमेव पदावरील प्रकरणी खालील प्रमाणे नियुक्तीपासून 10 , 20 व 30 वर्षांनंतर आश्वासित प्रगती योजनेचा पुढील टप्पा अनुज्ञेय होईल .

या संदर्भात राज्य शासनांच्या वित्‍त विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला दिनांक 02 मार्च 2019 रोजीचा GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्किल करावेत ..

शासन निर्णय (GR)

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *