Live Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Government Employee HRA Allowance Increase by 3% see ] : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासुन 4 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे , आता डी.ए वाढीनंतर घरभाडे भत्ता मध्ये देखिल मोठी वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे .
घरभाडे भत्ता मध्ये होणार 3 टक्के वाढ : सातव्या वेतन आयोगानुसार घरभाडे भत्ता मध्ये 25 टक्केच्या पटीत महागाई भत्ता वाढीनंतर घरभाडे भत्ता व वाहन भत्ता मध्ये वाढ अपेक्षित आहे . सरकारी कर्मचाऱ्यांचा डी.ए हा 25 टक्के पार केल्यानंतर घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करण्यात आली .आता जेंव्हा महागाई भत्ता हा 50 टक्के पार होईल त्यावेळी एचआरमध्ये वाढ होणार आहे .सध्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना X श्रेणीमध्ये 27 टक्के ,Y श्रेणीत 18 टक्के तर Z श्रेणीत 9 टक्के घरभाडे दिला जात आहे ! डी.ए 50 टक्के पार केल्यानंतर वाढीव घरभाडे भत्ताचे दर पुढीलप्रमाणे असणार आहेत ..
अ.क्र | वास्तव्याच्या ठिकाणानुसार शहर / गावांची श्रेणी | वाढीव HRA दर |
01. | X | 30 |
02. | Y | 20 |
03. | Z | 10 |
घरभाडे भत्ता कधी वाढणार : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 01 जुलै 2023 पासुन 46 टक्के दराने डी.ए अदा करण्यात येत आहेत , तर माहे जानेवारी 2024 मध्ये 5 टक्के डी.ए वाढल्यानंतर एकुण डी.ए 50 टक्के होईल , त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता मध्ये वरीलप्रमाणे सुधारित दर निश्चित करण्यात येईल .
घरभाडे भत्ता वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या वाहन भत्ता मध्ये देखिल वाढ करण्यात येईल , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या एकुण वेतनांमध्ये मोठी वाढ होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.