live marathi pepar प्रणिता पवार प्रतिनिधी [state employee GR ] : कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करणे संदर्भात कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की , कृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने , असलेली कुंठीतता घालवण्यासाठी संबंधित पदांना बारा वर्षाच्या नियमित सेवेनंतर त्यांच्या पदोन्नती साखळीतील वरच्या पदावरील वेतनश्रेणी देण्याची कालबद्ध पदोन्नती योजना सुधारित करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाला मान्यता दिल्याप्रमाणे दोन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास सदर शासन निर्णयानुसार , मान्यता देण्यात येत आहे .
त्याचबरोबर कृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करताना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 1 एप्रिल 2010 , दिनांक 5 जुलै 2010 व दिनांक 6 सप्टेंबर 2014 मधील सर्व तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येत आहेत .
तसेच कृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करताना प्रस्तुत प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहेत .
यासंदर्भात कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाकडून दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय (GR) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.