Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Retirement Age 60 Year ] : देशांमध्ये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 60 वर्षांपर्यंत वाढ लागु केल्यानंतर देशातील 25 राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 60 वर्षांची वाढ लागु करण्यात आलेली आहे , याच धर्तीवर राज्यातील कर्मचारी हे सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये 02 वर्षांची वाढ करण्याची मागणी करत आहेत .

सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी होणार मान्य : सध्या राज्य शासनांकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीवर सकारात्मक निर्णय घेतले जात आहेत , जुनी पेन्शन योजना नंतर कर्मचाऱ्यांची दुसरी मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे ही आहे .येत्या अधिवेशनांमध्ये याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे .

सेवानिवृत्त झालेले / होत असणाऱ्यांना मिळणार अतिरिक्त सेवेचा लाभ : राज्य शासनांने सेवानिवृत्तीचे वयांमध्ये वाढ केल्यास जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशांना दोन वर्षांची वेतनवाढ लागु करुन पेन्शन निश्चित केली जावू शकते . तसेच जे कर्मचारी नुकतेच सेवानिवृत्त होत आहेत अशांना अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल .

सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये वाढ लागु केल्यानंतर कर्मचाऱ्यांना 02 वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे .सध्या राज्यांमध्ये गट अ , ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहे , याच संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात येणार आहेत , गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षेच आहे .

सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची आवश्यकता : सध्या सरकारी नोकरीची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे , यामुळे या नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना वयाचे 30 ते 35 वर्षे गाठावे लागत आहेत , त्यात काही पदांना 03 वर्षांचा सेवक कालावधी असतो , यामुळे अशांना अत्यल्प सेवा मिळते . आणखीन सेवानिवृत्तीनंतर जुनी पेन्शन नाही . यामुळे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची आवश्यकता कर्मचाऱ्यांना वाटत आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *